Thursday, November 17, 2011

एक गोष्ट अर्धवट राहिलेली

एक गोष्ट अर्धवट राहिलेली
सुरूवात झालेली आणि शेवट माहिती असलेली

पण मधेच थोडी अडखळलेली-भांबावलेली आणि दुखावलेली सुद्धा
शब्दांच्या डोंगरातुन मूकपणे काही सांगणारी
घटनांच्या श्रुंखलात राहुनही मुक्त असणारी

सुरूवात आणि शेवट यांच्या मधेच अडकलेली गोष्ट पूर्ण कशी करावी?
शब्दांनी,भावनांनी,घटनांनी की नुसत्त्याच चित्रांनी मधली जागा भरावी?

तशी तिला शेवटापर्यंत जाण्याची घाई नाही
"अरे वा!" किंवा "अरे रे!!" यांचं आकर्षण नाही
छोट्या निरर्थक घटनांचा राग नाही
मोठ्या अवघड शब्दांचा सॊस पण नाही
पण गोष्टीतला प्रत्येक शब्द मात्र आरश्याचा तुटलेला तुकडा असावा,
खुपला टोचला तरी स्वत:चा ’एकच’ चेहरा त्यात दिसावा

एक गोष्ट प्रामाणिकपणे पूर्ण होण्याची वाट बघणारी
सुरूवात झालेली आणि शेवट माहिती असलेली.

7 comments:

Fundu :) said...

Sahi aahe!!! Ekdam pro writer...

केवळ तुज साठी...! said...

पराग, गोष्ट पूर्णत्वाला जाणं आपल्या हातात नसेल कदाचित, पण त्याचा अनुभव गाठीशी बांधून पुढे जाण्यातच अर्थ आहे.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचा शेवट हा सरोवर जरी असला, तरी काही थेंबांचा प्रवास अर्धवट राहतो. कोणास ठाऊक - ते थेंब म्हणजे स्वाती नक्षत्रामधले पाण्याचे थेंब असतील जे शिंपल्यात मोती बनून उजळून उठतील!

Shardul said...

Sunder ...

Sukalp said...

Khup chhan aahe. Waiting for your next post...

Parag said...

@Sabaji - 1 number comment :) Sahi lihila ahes tu.

@Fundu:),shardul,Sukalp - Thanks!

adwait said...

sorry .. paN likhaaN pochala nahi ithaparyant. majhya samwedanakshamatechaa rhaasahi hyaalaa kaaraNIbhut asel ....

Parag said...

@Adwait - Are evdhi "pohochleli" kavita nahiye...so swatahala dosh deu nakos :)
Ha jar "Sandarbhasahit Spashtikaran Dya" cha prashna asta tar tula 5 paiki 4 mark tuzya pramanikpanasathi dile aste (1 mark faar avaghad shabda vaprlyabbadal cut) :)