Sunday, January 14, 2007

Finding Neverland….

"वाचण्याची आवड" अशी टिपिकल hobby सांगणारा मी गेल्या दहा महिन्यात एकही पुस्तक पुर्ण वाचले नाही. नाही म्हणायला काही पुस्तके सुरु केले पण पुर्ण वाचुन नाही झाले. एकतर इकडे अमेरिकेत आल्यापासुन माझ्या अपार्टमेंटच्या या रंगीत लाईट मधे वाचणे जीवावर येते. एकदम municipality light खाली बसुन अभ्यास करणारया थोर लोकांसारखे वाटते.("मोठा" होण्यासाठी असा अभ्यास करावा लागतो असे ऐकले होते......पण ते मोठे होणे म्हणजे चष्माच्या नंबरबद्दल असावे असे स्वानुभवावरुन मी सांगु शकतो.)
E-books वाचुन पुस्तक वाच्यण्याचा फील आणि मजा नाही येत.
तर सध्या मी "Alice in Wonderland" वाचतो आहे(...की होतो?).
Lewis Carroll चे बरेच quotes वाचुन “Alice...” वाचावे वाटले.
Harry Potter - अनेक दिवस टाळाटाळ करुन शेवटी वाचायाला सुरुवात केली होती. पाहिले पुस्तक वाचुन संपायच्या आत मी Harry Potter चा फॅन झालो होतो.आता त्याच्या "Harry Potter and the Deathly Hallows" ची वाट बघतोय.
Harry Potter आणि त्याची गॅंग, आपला फास्टर फेणे,sherlock holmes,Watson,Calvin ani Hobbes आणि असे बरेच जण एकत्र करुन एक वेगळे खरेखुरे जग असावे असे माझे एक स्वप्न आहे.
The Fountainhead (Ayn Rand) - एकदम जड पुस्तक - बराच वेळ लागला वाचायला. एक गोष्ट धड कळात नव्हती. हा असा का वागतो? ती तशी का वागते? मग हा हीरो का? हा villain का?....नुस्ते प्रश्न! पुस्तकाच्या शेवटी howard roark चे कोर्टातले speech येते आणि सगळा उलगडा होतो - Amazing Philosophy! एखाद्या पुस्तकाने तुम्हाला नविन विचार, अनुभव दिला नाही तर ते वाचुन नवाचुन सारखेच. Alchemist पण असेच पुस्तक - वेगळी Philosophy!


Thanksgiving वीकेंडला Disneyland ला गेलो होतो तेव्हा मला या खोट्या जगाची खरी जादु कळाली आणि इतके दिवस ज्याचा doubt होता ती गोष्ट एकदम accept करावी वाटली - Yes I love this make believe world........maybe more than real!
पिटर पॅनच्या नेवरलॅंड सारखे प्रत्येकाचे एक नेवरलॅंड असतेच - त्या जगातील रंगही आपले असतात आणि चित्र काढणारे हातही आपालेच असतात. आपाण वास्तव जीवनातल्या अनुभवांना fictional गोष्टीचे संदर्भ लावतो - गोष्टीतल्या characters मधे स्वत:ला शोधायला बघतो.......आणि शेवटी हरवुन जातो..........दोनीही जगात!!!

हमको मालुम है जन्नत की हकिकत लेकिन
दिल के खुश रखनेको, 'गालिब' ये खयाल अच्छा है

Saturday, January 6, 2007

Life is calling…..!!!!!

शास्त्रीय संगित कधी कळेल का?

एखाद तरी वाद्य वाजवता येइल का कधी?

जे. के. रोलिंगला Harry Potter लिहिताना आलेली मजा आपल्याला समजेल का?

चित्र काढताना खरया जगातल्या वस्तु कागदावर उतरावताना आवश्यक असणारी चित्रांची भाषा कधी कळणार आहे का?

सिन्दाबाद सारखे जगभर फिरता येईल का?

Walt Disney सारखे स्वप्न वास्तवात उतरवता येईल का?

एडिसनला बल्ब साठी १००० प्रयोग करायला लावण्या मागचे Motive (आणि मजा) कधी कळणार आहे का?

Howard Roark - Fountainhead मधे म्हणतो तसा Creator चा -First hand experience - कधी घेता येईल का?

hmmmm...........बरयाच गोष्टी आहेत करण्यासारख्या!!!

Life is calling.........where are you?