Saturday, March 3, 2007

Chariots Of Fire

काल "Chariots Of Fire" पाहीला.
वॅन्जेलीसच्या ट्युनवरुन "Chariots...." सापडला आणि one-line-story वाचुन चांगला वाटला.
खुप चांगला, आवडला,ठीक आहे - यातले एक लेबल लावायाचे बाकी आहे. तसं लेबल लावण्याची काही घाई नाही आणि लावलेच पाहीजे असे पण नाही.
अब्राहम आणि एरिक. दोने English अथेलिट. Olympic रेस मधे जिंकण्याची दोघांची महत्वकांक्षा.
पण जिंकण्याचे motive मात्र वेगळे.
अब्राहम ज्यु असतो. ज्यु असल्याने जे सोसावे लागले त्याचा बदला त्याला सर्वोत्कृष्ट ठरुन घ्यायचा असतो.
एरिक एक missionary असतो. धावण्यातुन देवाशी नाते जोडु पाहणारा. Olympic नंतर चीन मध्ये जाऊन मिशनरीचे काम करायचे त्याने ठरवले असते.
पॅरिस olympic. 100m रेस रविवारी असते.
रविवार म्हणजे Sabbath - देवाचा दिवस.एरिक रेस मध्ये भाग घेण्यास नकार देतो.धर्माबद्दलची त्याची निष्ठा त्याला त्याच्या स्वप्नापेक्षा मह्त्वाची वाटते.
अब्राहम 100m रेस बड्याबड्यांना मात देऊन जिंकतो.
एरिक दुसरया दिवशी होणारया 400m रेस मधे भाग घेतो आणि पहिला येतो.
शेवटी दोनिही HERO जिंकतात.वॅन्जेलीसच्या music बरोबर picture संपतो.

सत्यघटनेवर आधारीत असलेला "Chariots..." बघुन काही tangent प्रश्न पडले -
धर्म माणसाच्या आयुष्यात किती मह्त्वाचा असतो?
धर्म आपल्यासाठी का आपण धर्मासाठी?
धर्माशिवाय आपण जगु शकतो का?
आपला धर्म आणि आपले आयुष्य एकमेकांना पुरक आहेत का?
का आपल्याला धर्माने बांधुन जखडुन ठेवले आहे?
या प्रश्नांना उत्तरे आहेत. पण बरयाच प्रश्नासांरखी प्रत्येकासाठी वेगवेगळी - ज्याचे त्याने स्वःतचे उत्तर शोधायचे.
धर्म एक Personal गोष्ट आहे. ती तेवढीच personal आणि harmless असावी.
प्रत्येक धर्म त्या त्या काळातल्या परिस्थिती नुसार घडला. काळ बदलला तसे धर्म बदलेले का?

Eric चुक का बरोबर?
त्याला वाटले त्याने चुक केली तर तो चुक.
त्याच्या नंतरच्या आयुष्यात त्याला केलेल्या गोष्टीचा कधीच पश्च्याताप झाला नाही तर तो बरोबर.

शेवटी तुम्ही स्वःताच्या मनाला कसे समजवु आणि फसवु शकता यावरच तुमचे सुख आणि दुःख अवलंबुन असते. हो ना?

5 comments:

केवळ तुज साठी...! said...

एरिकने नक्की चूक केली आहे.
धर्म म्हणजे माणसाने स्वतःसाठी बनवलेले नियम.

पण हे नियम वेळेप्रमाणे बदलायला हवे.

परंतु त्याची धर्मनिष्ठा खरंच वाखाणण्याजोगी आहे.

हे सामान्य माणसाला जमणार नाही हे निश्चित.

HAREKRISHNAJI said...

गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो.

Anonymous said...

Well, thats a very well-written piece, and at the same time, well-thought about, too!
According to me, If Eric was confident about winning another race the next day, he did not do anything wrong; esp. because defeating Abraham, or anyone else for that matter, was never his purpose!
However from a movie-lover's point of view, it would definitely be interesting to see how the director would have handled the competiton between them, and the judgement that said who's the winner amongst them!! :-)

Vidya Bhutkar said...

मी म्हणणार नाही की एरिकने चूक केली.आपण धर्म ही एक कल्पना किंवा अशी गोष्ट जिच्यावर आपला सर्वाधिक विश्वास आहे असे मानले तर चित्रपट एकदम बरोबर होऊन जातो. समजा धर्माऎवजी तुमचा एखादा मित्र किंवा आपले आई-बाबा/मुले यांचं काही महत्त्वाचं काम निघालं तर तुम्ही त्यांच्यासाठी आपली सर्वात प्रिय/महत्त्वाचे कामही सोडालंच ना? कारण त्या व्यक्तीवर आपली श्रद्धा आहे. हमम...असो. पण कथा आणि त्याचा शेवट दोन्हीही आवडले.

adwait said...

good 4 debate !! thts it ...
jyaachaa tyaachaa prashna aahe ..