एक पांढरा शुभ्र कागद........
काही लिहायचे आहे? कविता , सुखांत असलेली एखादी गोष्ट?
नाहितर काळ्या पेन्सिलने चित्रच काढावे..... सुर्यास्त होत आहे आणि कोणीतरी एकटा सुर्याकडे पाहात बसलाय!
रंग नकोच चित्रामधे.....काळा आणि पांढरा पुरे.....संध्याकाळ जमली म्हणजे झालं.
संध्याकाळ....शब्दात आणि चित्रात न पकडता येणारी........
"य़े जिंदगीभी एक नशा है दोस्त. ज़ब चढता है तो पुछोना क्या आलम रेह्ता है लेकिन जब उतरता है तो..." देव आनंद आणि मग सुरु होणारे "दिन ढल जाये..." !!
पांढरया शुभ्र कागदावरचा सुर्यास्त.........कागदाचे काय- कविता , कथा काहिही चालते त्याला.
कागदाचे काम शब्दांशी....ते पोहोचले म्हणज झालं.
फार कोणाला कळेल असे काही उतरवु नये कागदावर......
कागद पण गुढ प्रश्न नाही विचारणार......हे असे का? ते तसे का? म्हणुन.
हा सुर्य असाच राहील.
हा कागदावरचा सुर्य बुडणार नाही , कागदावर अंधार होणार नाही....
....आणि कागदाच्या चौकटित अडकलेला सुर्य पुन्हा उगवणार पण नाही.
Monday, February 19, 2007
Wednesday, February 14, 2007
Science - Boon or Bane?
Valentine day असताना (हे उगाचच Romantic वातावरण निर्मिती साठी) -
हातात गरम कॉफीचा कप असताना -
दुपारी ऑफीस मधली हक्काची(?) timepass करण्याची वेळ असताना -
बाहेर मस्त स्नो-फॉल होत असताना -
इकडे-तिकडे-वर-खाली confuse होऊन फिरणारे सुंदर snowflakes पाहुन काय आठवावे?
Heisenberg's uncertainty principle?
इन्द्रधनुष्य पाहुन काय आठवते?
Refrraction of Light?…..!!!!
Now, we have a situation here.......
hmmmm.......!
माझ्या पुढच्या ब्लॉग मधे वाचा
" ' ती' आणि Theory of Ralativity" एक मराठी Sci-fi-romantic कविता.
हातात गरम कॉफीचा कप असताना -
दुपारी ऑफीस मधली हक्काची(?) timepass करण्याची वेळ असताना -
बाहेर मस्त स्नो-फॉल होत असताना -
इकडे-तिकडे-वर-खाली confuse होऊन फिरणारे सुंदर snowflakes पाहुन काय आठवावे?
Heisenberg's uncertainty principle?
इन्द्रधनुष्य पाहुन काय आठवते?
Refrraction of Light?…..!!!!
Now, we have a situation here.......
hmmmm.......!
माझ्या पुढच्या ब्लॉग मधे वाचा
" ' ती' आणि Theory of Ralativity" एक मराठी Sci-fi-romantic कविता.
Subscribe to:
Posts (Atom)